अंबड : भारतीय जनता पार्टी अंबड शहर मंडळाच्या वतीने गणेश भक्तांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अंबड वार्ताचे संपादक बळीराम राऊत यांचा विशेष सत्कार आमदार नारायण कुचे व नगराध्यक्ष देविदास कुचे यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमाला जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दीपकसिंह भैय्या ठाकूर, नगरसेवक विठ्ठलसिंह राणा, केदारदादा कुलकर्णी, अंबड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव, नगरसेवक गंगाधरजी वराडे, तारीख भाई चाऊस, बबनरावजी बुंदेलखंडे, फिरोज अध्यक्ष राहुल खरात, रमेशभाऊ बुंदेलखंडे, सुरेश गुडे, सौरभ कुलकर्णी, नरेश बुंदेलखंडे, बाबुराव खरात आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सरगम आर्केस्ट्रा, संभाजीनगर यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी अंबडकरांचे मन जिंकले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

Post a Comment
0 Comments