Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

 



कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला 

या कार्यक्रमाचे ध्वजारोहण भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री दीपक सिंह ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाला भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.ज्योती भाभी ठाकूर , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती माधुरीताई बागडे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. व्यंकटेशजी गोसावी, कार्यवाह केदारजी मंत्री ,शालेय अर्थ समिती अध्यक्ष रमेश भाऊ बुंदेलखंडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकरजी घायतडक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी उपस्थित होते.

      या कार्यक्रमात दीपक सिंह ठाकुर यांनी आपल्या भाषणात मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या कार्याची ओळख सर्वांना करून दिली. तसेच भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच वाढदिवसानिमित्त होत असलेले उपक्रमाची माहिती सर्वांना करून दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती माधुरीताई बागडे यांनी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याची व त्यागाची आठवण सर्वांना करून दिली. 

     या कार्यक्रमात ज्योती भाभी ठाकूर यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल शैक्षणिक संकुलातर्फे ज्येष्ठ शिक्षिका रेखा देशमुख व रागिनी भाले यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

   शाळेतील विद्यार्थिनी भूमी महेंद्र जामोदेकर हिने स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई शेळके तसेच श्रावणी बंडू कचरे हिने स्वातंत्र्यसैनिक आशाताई वाघमारे यांच्या कार्याची ओळख सर्वांना करून दिली.

   गणेशोत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

  इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. वेदिका संदीप कुलकर्णी हिचा वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर घायतडक यांनी तर वैयक्तिक पद्य रेखा देशमुख यांनी सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती निशा जोशी यांनी तर ऋणनिर्देश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.

Post a Comment

0 Comments