Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड-जालना महामार्गावर भीषण अपघात : तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, पिकअप चालक पसार

 




अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


अंबड :आज दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी साधारण 6 वाजता अंबड-जालना महामार्गावर (NH 753 H) गोलापांगरी टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पिकअप चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव भगवान उद्धव काळे (वय 30, रा. घुंगरडे हादगाव, ता. अंबड, जि. जालना) असे आहे. तो MH-21 AZ-6932 या मोटरसायकलवरून जालन्याकडून अंबडकडे येत असताना, समोरून वेगाने येणाऱ्या MH-01 AP-2040 पिकअप वाहनाचा जोरदार धडक बसला.



या भीषण धडकेत भगवान काळे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ ॲम्बुलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.


अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक आर. के. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली HC/446 राठोड, HC/438 बरले, PC/825 गवई, PC/1480 दाभाडे तसेच तालुका पोलीस स्टेशनचे HC मेहेत्रे यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.


दरम्यान, अपघाताच्या वेळी जोरदार पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहने महामार्गाच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातामुळे मोटरसायकल व पिकअप दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.


या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलीस पिकअप चालकाचा शोध घेत आहेत.


Post a Comment

0 Comments