अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
(अंबड -) कै.दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात विस्तार सेवा विभागाअंतर्गत गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी जमा केलेले एक मुष्टी धान्य एकत्रित गोळा करून विद्यार्थ्यांमध्ये समर्पण भावधारा विकसित व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन शाळेत केले जाते.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.राजेंद्रजी भाला सर तसेच प्रमुख उपस्थित माधवभाऊ शेषराव पवार( मनमंदिर मनोरुग्ण महिलांचा आश्रम ढाकलगाव ) तसेच सारिकाताई माधव पवार व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा श्री.प्रदीपजी जोशी सर माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका श्रीमती.निशा जपे मॅडम व्यासपीठावरती उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. सारिका ताई पवार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की मनोरुग्णाची सेवा ही ईश्वरांची सेवा केल्यासारखी होते. म्हणून आम्ही तीन वर्षापासून या रुग्णांची सेवा करत आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतो आणि समाजातून देखील मदत खूप मोठ्या प्रमाणात मिळते असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. राजेंद्रजी भाला साहेब म्हणाले की देश हमे देता है , सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे या उक्तीप्रमाणे आपण समाजामध्ये आपल्याजवळ आहे त्यातून इतरांना सहकार्य करण्याची भावना नेहमी जोपासावी. विद्यार्थी दशेपासून आपण ती अंगीकारली पाहिजे. एक मुष्टी धान्य समर्पण आपण देऊन आपल्यामध्ये देण्याची वृत्ती विकसित होते. मनोरुग्णांना मदत करण्याची व नेहमी सहकार्याची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री अनिल चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा श्री मारोती झाटे सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्राने झाली.

Post a Comment
0 Comments