अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
मौजे लालवाडी तालुका अंबड येथे शेतकरी कर्जमाफी व हमीभावासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांची सभा दिनांक 3 आक्टोंबर शुक्रवार रोजी संपन्न झाली. सभेला रात्री दहा वाजेला सुरुवात होऊन देखील लालवाडी परिसरातील शेतकरी वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता यावेळी बच्चू कडू यांनी सरकारचे शेतकऱ्यांविषयी असलेले धोरण याचा पाढा वाचला तसेच मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या टीकास्त्र सोडलं. शेतकऱ्यांनी जाती जातीत व धर्माधर्मात वाद सुरू ठेवावे म्हणजे शेतकऱ्यांना आपण शेतकरी असल्याचा कधी बोलता येणार नाही अशी फडणवीस यांची मानसिकता असल्याची टीका. मुख्यमंत्री फडणवीस सरकार बनवन्यात फोडाफोडी करण्यात पटाईत आहेत फडणवीस यांच्याकडे सर्व गुण असताना देखील जाणून-बुजून जातीजातीतील वाद तेवत ठेवत आहे. सरकारच्या सात लाख कोटीच्या बजेट मध्ये शेतकऱ्यांना कुठेही जागा नसल्याची टीका व शेतकऱ्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला तसेच येणाऱ्या 28 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांना एकजूट करून कर्जमाफी हमीभाव बोला दुष्काळ व शेतकरी जिवंत आहे हे दाखवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाहनाने नागपूरला पोहोचा असा संदेश दिला आहे. या सभेचे आयोजक प्रदीप पाटील शिंदे तर उपस्थिती प्रहार प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ जालना संपर्कप्रमुख गजानन लोखंडकर जिल्हाप्रमुख सावळा हरी शिंदे श्रीमंत राऊत तसेच हवामान तज्ञ अशोक तोडकर ऋषिकेश पागिरे ,रुग्णसेवक जगन्नाथ ठाकूर ,सुनील पंडित ,लखन शिंदे , संदीप कदम आदी उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments