मंठा/प्रतिनिधी : मंठा येथील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिरात शारदीय नवरात्री निमित्त भव्य गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी नवरात्र उत्सवासाठी अथक परिश्रम घेतले.
शारदीय नवरात्र उत्सवात भव्य दांडिया कार्यक्रमासह फॅन्सी ड्रेस स्पर्धा, भजन, नवदुर्गा, मंगल पाठ आदी कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडले. या उत्सवात महिषासुर वधाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात कु. नेतल दायमा, कु. रिया दायमा, मेघा भुतडा, वैष्णवी दायमा, प्रांजल लटुरिया, अमृता मुरक्या, प्रियांका दायमा, साक्षी तायल, लक्ष्मी सोमाणी, ममता भुतडा, गीता दायमा, प्रीती राठी, सुषमा मुरक्या, पुनम बलदवा, ज्योती मुरक्या, प्रिया मुरक्या, राधिका राठी यांनी प्रभावी भूमिका साकारल्या, तर महिषासुरची भूमिका कु. सिद्धी तायल हिने नृत्यभिनयाने प्रस्तुत केली.
या प्रसंगी आनंदराम सोमानी, गिरीश मुरक्या, राजेश मणियार, योगेश भुतडा, गणेश बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा सौ. शितल शरद मुरक्या, उपाध्यक्षा सौ. ममता दायमा, कोषाध्यक्षा सौ. राखी मणियार, सचिव सौ. पूनम बलदवा, सदस्य वर्षा सोमानी, पूनम साबू यांच्यासह सर्व मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या, समाजातील महिला भगिनी व समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments