प्रतिनिधी जामखेड
अंबड तालुक्यातील जामखेड सर्कल हे अत्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा चर्चेचा विषय बनले आहे.
यामध्ये पक्षाचे व इतर अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये चांगली चर्चा रंगली आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते व राम भक्त म्हणून जनतेच्या कामामध्ये नेहमी सक्रिय असणारे गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे पंकज मंडलिक यांची सध्या चांगली चर्चा जोरदार रंगली आहे अपक्ष म्हणून त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर गंगाधर पांढरे ,पल्लवी तारडे , सचिन जाधव,रामचंद्र भोजने, विलास राठोड, व इतर पक्षाचे रतन तारडे ,सिताराम धुळे ,भाऊसाहेब भोजने, या सर्वांचे नाव चर्चेत आहे परंतु परिसरामध्ये व गावांमध्ये जो जनतेचे काम करतो जो जनतेच्या हितासाठी बोलतो त्याचाच विजय होणार आहे अशी चर्चा चांगलीच रंगली आहे यावेळेस भ्रष्टाचारी आणि सत्ताधारी व प्रस्थापितांचा सुपडा साफ होणार आहे अशी चर्चा जामखेड सर्कलमध्ये रंगली आहे.
पंकज मंडलिक हे अत्यंत नवतरुण तरुण तडफदार नेतृत्व दोन वेळेस सरपंच या पदास उभे होते दोन वेळेस त्यांचा पराभव ही झाला परंतु तरीही त्यांनी गोरगरिबाची कामे करणे सोडले नाही नेहमी लोकांच्या संपर्कामध्ये विविध चांगल्या कामांमध्ये घरकुल असेल व इतर काही गोरगरिबाच्या अडचणी सोडण्याचा नेहमी त्यांनी प्रयत्न केला म्हणून आज हे नाव गोरगरिबाच्या व गावाच्या व सर्कलमध्ये चर्चेत आहे.
इतर नावाचाही विषय चांगलाच रंगला आहे कारण भारतीय जनता पार्टी कोणाला उमेदवारी देतो याकडे विरोध पार्टीचे लक्ष आहे व विरोध पार्टी कडून कोण उमेदवार आहे याकडे भारतीय जनता पार्टीचे चांगले लक्ष आहे परंतु ओबीसी मधून चेहरा व स्वतः नेतृत्व करणारा चेहरा हा जनतेच्या मनातील चेहरा पक्षाने दिलेल्या नावांमध्ये दिसून येत असल्यामुळे पंकज मंडलिक सध्या चर्चेचा विषय बनले आहे परंतु अपक्ष लढतात की इतर पक्षाकडून तिकीट घेऊन लढतात याकडे इतर पक्षांच ही लक्ष लागले आहे,
त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येतो की भारतीय जनता पार्टीचा की अपक्ष याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण या वेळेस जनता बदल करणार व जनतेच्या मनातील उमेदवार निवडून येणार अशी चर्चा चांगली चांगली असल्यामुळे जामखेड सर्कल चांगले चर्चेत आहे म्हणून जामखेड चा जिल्हा परिषद सदस्य कोण याकडे वरिष्ठांचेही लक्ष चांगलीच वेधले आहे.
कोट पंकज मंडलिक यांनी प्रतिक्रिया दिली की मी एक गरीब कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करत आहे जनतेने संधी जर दिली नक्कीच जन सेवा केल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment
0 Comments