Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मंठा ग्रामीण रुग्णालयात लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे - संतोष वरकड



 मंठा ग्रामीण रुग्णालयात लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे - संतोष वरकड........ मंठा/प्रतिनिधी : मंठा ग्रामीण रुग्णालयांमध्ये दिव्यांग बोर्ड सुरू करून तालुक्यातील लाभार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष तथा माजी सभापती संतोष वरकड यांनी केली आहे. 

       दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी जालना येथे जावे लागते त्यामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाया जातो याशिवाय मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जिल्हा शल्य चिकित्सकांनी तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग बोर्ड स्थापन करून तालुक्यातील लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्यास दिव्यांगांची हेळसांड होणार नाही. 

       मंठा येथील अनेक दिव्यांग लाभार्थी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दर बुधवारी जालना येथे चकरा मारतात. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग एकाच दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असल्यामुळे अनेकांना प्रमाणपत्र न घेता परत यावे लागते. त्यामुळे लाभार्थ्यांची गरज लक्षात घेता जिल्हा शल्य चिकित्सकांनी मंठा ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बोर्ड सुरू करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी श्री वरकड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments