शिवसेना शिंदे गटाकडून घुंगर्डे हादगाव गणात पंचायत समीतीसाठी गजानन शिंगटे चर्चेत
बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
आगामी काळात होणार असलेल्या अंबड पंचायत समिती निवडणुकीसाठी घुंगर्डे हादगाव पंचायत समिती गणातुन शिवसेना शिंदे गट पक्षाकडून युवा कार्यकर्ते गजानन शिंगटे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून जय्यत तयारी सुरू केली आहे. या गणातून अनेक उमेदवार इच्छुक असले तरी शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार हिकमत दादा उडान यांचे विश्वासू सहकारी गजानन शिंगटे यांचे नाव पंचायत समिती साठी प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहे. समाजकार्यात ते नेहमी सक्रिय असतात. त्यांचा घोंगर्डे हदगाव व परिसरात दांडगा जनसंपर्क असून ते सतत सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असतात. सर्व समाजात वावर असलेले गजानन शिंगटे यांनी प्रत्येकांच्या प्रश्नाशी बांधिलकी जपली आहे. पक्षाने गजानन शिंगटे यांना संधी दिल्यास ते निश्चितच त्या संधीचे सोने करून घुंगर्डे हादगाव गणाचा सर्वांगीण विकास साधतील, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात त्यांनी नेहमीच सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे व जनसंपर्कामुळे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार सहज विजयी होईल. असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments