Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दसऱ्याच्या मुहूर्तावर माऊली ऑटो पार्टचे भव्य उद्घाटन

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 


अंबड शहरात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माऊली ऑटो पार्ट या नव्या उपक्रमाचे भव्य उद्घाटन माजी जिल्हा परिषद सभापती बप्पासाहेब गोल्डे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी अंबड वार्ताचे संपादक बळीराम राऊत, बबलू शेठ परदेशी, विक्रम भाऊ गटकळ, ज्ञानेश्वर गटकळ, रुद्रा डुबल, दत्ता गटकळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना "स्थानिक पातळीवर अशा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अंबड परिसरातील वाहनधारकांना मोठी सोय होणार आहे," असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी बप्पासाहेब गोल्डे पाटील यांनी शुभेच्छा देताना, “दसरा हा विजयाचा सण आहे. या पवित्र दिवशी सुरू झालेले माऊली ऑटो पार्ट नक्कीच यशस्वी होईल आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील,” असे उद्गार काढले.

कार्यक्रमाचे संयोजन उत्तम रीतीने पार पडले. शेवटी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भविष्यातील यशस्वी प्रवासासाठी मंगलकामना करण्यात आल्या.


Post a Comment

0 Comments