Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पोलीस पाटील भरती मुलाखतीसाठी वेळापत्रक जाहीर — उमेदवारांनी वेळेवर हजर राहावे : तहसीलदार विजय चव्हाण यांचे आवाहन

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

अंबड : पोलीस पाटील भरती 2025 मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांचे दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी वेळापत्रक (शेड्युल टाईम टेबल) जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेनुसार कागदपत्र तपासणीसह मुलाखतीकरिता अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार विजय चव्हाण यांनी केले आहे.


तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले की, “दिलेल्या वेळेनुसार उमेदवार उपस्थित राहिल्यास त्यांच्या सोयीसाठी प्रक्रिया सुरळीत पार पडेल. वेळेवर न आल्यास गैरसोय होऊ शकते.”


तसेच त्यांनी सर्व गावांमध्ये ही माहिती जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणत्याही उमेदवाराची संधी हुकणार नाही. गावातील नागरिकांनी, ग्रामसेवकांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनीही ही माहिती प्रत्येक गावाच्या ग्रुपवर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


📅 मुलाखतीची तारीख: 16 ऑक्टोबर 2025

🏢 स्थळ: तहसील कार्यालय, अंबड


सर्व पात्र उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहून आपली कागदपत्रे तपासणीसाठी तयार ठेवावीत.


Post a Comment

0 Comments