Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जालना महापालिकेचे आयुक्त लाच घेताना रंगेहात





लाचलुचपत विभागाची कारवाई; दहा लाखांची रोकड जप्त


 अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेतील विविध विकासकामांच्या बिलांची रक्कम मंजूर करण्यासाठी खांडेकर यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गुरुवारी रात्री उशिरा लाचलुचपत विभागाने खांडेकर यांच्या राहत्या घरी सापळा रचून कारवाई केली. यावेळी दहा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात ही रक्कम लाच म्हणून स्वीकारली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खांडेकर यांच्यावर यापूर्वीही काही ठेकेदारांकडून बिल मंजुरीसाठी पैसे मागितल्याचे आरोप झाले होते. मात्र, यावेळी विभागाने थेट कारवाई करून त्यांना रंगेहात पकडले आहे.

सदर प्रकरणातील एकूण मागितलेली लाच रक्कम किती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, या प्रकरणाची सविस्तर माहिती व अधिकृत प्रेस नोट लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे जालना महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेकेदार, अभियंते व कर्मचारीवर्गामध्येही मोठी खळबळ आहे.



---

Post a Comment

0 Comments