अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पोस्टमार्टमच्या कामावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर काही व्यक्तींनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय कर्मचारी वर्गात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान संबंधित वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर होते. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारास रुग्णालयात एका अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे पोस्टमार्टम सुरू करण्याची तयारी सुरू असताना, काही व्यक्तींनी डॉक्टरांवर पोस्टमार्टम तात्काळ करण्यासाठी दबाव टाकला.
दरम्यान, त्याच वेळी इतर एका गंभीर जखमी रुग्णावर उपचार सुरू असल्याने डॉक्टरांनी थोडा वेळ मागितला, मात्र संतप्त झालेल्या काही व्यक्तींनी डॉक्टरांशी उलटसुलट बोलणे सुरू केले. परिस्थिती चिघळत जाऊन त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ केली व चापट, बुक्यांनी मारहाण केल्याचे डॉक्टरांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ आपली जबाबदारी इतर डॉक्टरांकडे सोपवून पोलीस ठाणे अंबड येथे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर डॉक्टरांनी सामान्य रुग्णालय, जालना येथे वैद्यकीय तपासणी करून उपचार घेतले.
या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने संबंधित सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सुपूर्द केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला असून, घटनेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आरोग्य विभागाकडूनही

Post a Comment
0 Comments