बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
दिवाळीपर्यत अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन हवेतच विरलं.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली शासन निर्णयाची होळी.जीआरची होळी करून साजरी केली काळी दिवाळी.
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं.आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे.मात्र अजूनही अतिवृष्टी बाधितांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे राज्य सरकारनं मदती संदर्भात काढलेल्या जीआरची होळी करत काळी दिवाळी साजरी केली आहे.
१५ ऑक्टोंबर रोजीच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयात ४८० कोटी व १६ ऑक्टोबर रोजी १३५४ कोटी रुपयांच्या मदत निधी वितरणाचा शासन निर्णय राज्य सरकारने काढला.मात्र यात जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
तसेच राज्य सरकारचा निषेध नोंदवत सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.तातडीनं मदत न केल्यास प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके, उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, भारत उंडे, सुभाष भोईटे,बप्पासाहेब काळे,प्रकाश सुरासे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती..

Post a Comment
0 Comments