बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील गोंदी सर्कल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचे कैवारी, सर्वसामान्यांचे नेते, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, गोंदी सर्कल मधील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व पंकज आप्पा सोळुंके पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे. गेली तीन ते चार दशकापासून पक्षाशी एकनिष्ठ असणारे, पक्षाचे काम प्रमाणिकपणे करणारे, शेतकरी, विद्यार्थी, निराधार, महिला, गोरगरीब लोकांसाठी अहोरात्र काम करून लोकांच्या मनात कायम घर करणारे, जनतेशी घट्ट नातं जोडून ठेवणारे, आपल्या हक्काचा माणूस म्हणून, जनमानसात भावना निर्माण करणारे, लोकाभिमुख आणि जनतेचा विश्वासू चेहरा म्हणून ओळख असणारे, व विविध नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर तोडगा काढण्यासाठी सदैव त्यांचा पुढाकार असतो. घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर हिकमत दादा उडान यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी मतदार संघात विकासाची गंगा वाहिलेली आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद गोंदी सर्कल मधील ग्रामपंचायत, पंचायत समिती, विविध कार्यकारी संस्था, सोसायटी, यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे गोंदी सर्कल मध्ये शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकताना दिसत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मागणी आहे की, युवा नेते पंकज आप्पा सोळुंके पाटील यांना गोंदी सर्कल मधून उमेदवारी दिल्यास शिवसेना शिंदे गटाला मोठे यश मिळणार असून त्यांचा अनुभव, जनसामान्यामधील संपर्क, जनसामान्यांना परिचित असणारे नेते पंकज आप्पा सोळुंके पाटील यांना एकदा संधी देण्याची व त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार गोंदी सर्कल मधील जनतेने केला असून, त्यांच्यासाठी तन-मन-धनाने काम करण्याची इच्छा असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत असून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प जनतेने केला आहे.

Post a Comment
0 Comments