Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शनिवारी राजु शेट्टी यांचा जालना दौरा

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव

 

लना जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची व गोदावरी नदीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर शनिवारी येत आहेत. 

  मा.खा. राजू शेट्टी साहेब हे शनिवार रोजी सकाळी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव,नाथवस्ती, विज्ञानेश्वर आपेगाव या गोदावरी नदीच्या महापुराने बाधित गावांना भेटी, अतिवृष्टी बाधित खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

  अंबड तालुक्यातील वडीगोद्री, सुखापुरी, गोंदी व शहागड मंडळामध्ये सलग दीड महिना सतत धार पाऊस पडून मुसळधार अतिवृष्टी झाली.यामुळे सप्टेंबर महिन्यात ५५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्याची सरासरी वार्षिक सरासरी ही ५९४ मिमी आहे.मात्र सप्टेंबर महिन्यातच ५५१ मिलिमीटर पाऊस झाल्याने एका महिन्यातच वार्षिक सरासरी भरून निघाली. 

   वडीगोद्री परिसरात आतापर्यंत ११३५ मीटर पावसाच्या नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या दुप्पट झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कापूस,तूर,सोयाबीन,मूग,मक्का व बाजरी या खरीप पिकांसह डाळिंब,मोसंबी,द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मोठे जन आंदोलन उभारणार आहे. त्यासाठीच राजू शेट्टी यांचा हा दौरा असल्याची माहिती स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिली.

  

Post a Comment

0 Comments