Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 


विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. सहकारी किनगाव येथील श्री. राजेंद्र वाघ, ग्रामपंचायत सदस्य श्री. भागचंद काळवणे, कचरू गांगी, नांदी येथील माजी सरपंच नाजेर पटेल, सोसायटी सदस्य पद्मसिंग मुरहाडे, मुस्तम पटेल, अमीन पटेल, हुजूर भाई पटेल, शिराढोन येथील माजी ग्रा. प. सदस्य अंकुश वायभट, मठ जळगाव येथील कैलास पोखरकर, गोपीचंद पोखरकर तसेच नागझरी येथील माजी सरपंच पाशू भाई पटेल, नामेज पटेल, पराडा दर्गा येथील अमीन खान, बाबा भाई यांसह अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या वेळी माजी आमदार शिवाजीराव चोथे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी किसान सेनेचे मराठवाडा अध्यक्ष रज्जाक भाई व तालुका उपाध्यक्ष पल्हाड नाना डोखळे यांच्या हस्ते अंबड येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री. नंदकिशोर भाऊ पुंड यांचीही उपस्थिती होती.

नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी त्यांना पक्ष कार्यात जोमाने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शुभेच्छाही दिल्या.

👉 हा पक्षप्रवेश अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढवणारा ठरला आहे

Post a Comment

0 Comments