Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भांबेरी येथे शालेय‌मंत्रिमंडळ निवडणुक‌ उत्साहात : चिमुकल्यांचा‌ आनंद द्विगुणित

 


साष्टपिंपळगाव:प्रा शा. भांबेरी येथे शालेय निवडणूक 

आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी जि प प्रा शा भांबेरी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली यावेळी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आयुष कणके. गौरी कणके व स्नेहल केस भट हे उमेदवार होते निवडणूक प्रक्रियेतून कुमारी गौरी कणके ही एकूण 90 मते मिळून मुख्यमंत्री म्हणून निवडून आली तसेच यावेळी शालेय उपमुख्यमंत्री यांची सुद्धा निवड करण्यात आली ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळेतील श्रीमती अश्विनी बडे श्री सागर जोशी श्री यादव सर श्री मोठे सर श्री हेलवाडे सर कुठे सर श्री गणेश जोशी सर श्री मोरे सर यांनी निवडणूक पार पाडण्यासाठी मदत केली यावेळी निवडून आलेली मुख्यमंत्री कुमारी गौरी कणके हिचा शाळेच्या वतीने श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मुख्याध्यापक गिरी सर यांनी निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या व त्यांना शालेय कामकाजात कोणकोणत्या भूमिका निभवाच्या याची माहिती दिली व निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींचे अभिनंदन केले सर्व प्रक्रिया मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली.

Post a Comment

0 Comments