Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिंतूर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

 मंठा - जिंतूर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा


....(अवैध दारू विक्री, मटनाची दुकाने, रस्त्याच्या दुतर्फा अवैध बॅनर व अतिक्रमण हटविण्याची मागणी)... मंठा/ प्रतिनिधी :  मंठा - जिंतूर या राज्य महामार्गावरील अवैधरीत्या सुरू असलेल्या दारूचा व्यवसाय बंद करावा, मटन-चिकन दुकानातील घाण या राज्य महामार्गाच्या कडेला टाकणाऱ्यावर कार्यवाही करावी यासह पाच गावातील हद्दीतून गेलेल्या राज्य रस्त्याच्या कडेला अनाधिकृत उभारलेली बॅनर व अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी कर्नावळ, हेलस, हेलसवाडी, रानमळा, लिंबेवडगाव येथील गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे मंठा पोलीस ठाण्यात केली आहे. 

        ग्रामस्थांनी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, मंठा - जिंतूर या राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसापासून अपघाताची मालिका  सुरू आहे. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वरील पाच गावाच्या हद्दीतून गेलेल्या या महामार्गावरील रस्त्याच्या कडेला सुरू असलेली अनधिकृतपणे दारू विक्री, अनधिकृत बॅनर व अतिक्रमण , त्याचबरोबर मंठा शहरातील मटन-चिकनचे व्यापारी हे दुकानातील सर्व घाण या रस्त्याच्या कडेला टाकत असल्यामुळे या ठिकाणी भटके कुत्रे जमा होऊन गाडीच्या समोर येतात. त्यामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. 

        या महामार्गावरील अवैध दारू विक्री, मटनाची दुकाने, रस्त्याच्या दुतर्फा अवैध बॅनर व अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच हबीब शेख ,नामदेव बनसोडे ,कैलास चव्हाण ,दत्ताराव कांगणे, ज्ञानेश्वर लोकरे, भीमराव राठोड , नवनाथ खराबे ,योगेश जाधव, रोहित राठोड , नितीन राठोड यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments