Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्वाभिमान शेतकरी संघटने कडून शासन निर्णयाची होळी

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 


  ऊस बिलातून टना मागे १५ रुपये कपातीच्या राज्य सरकारच्या मंत्री समितीच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली होळी करण्यात आली.

   सरकार आता पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली दलाली करू लागले आहे.सरकारने दलाली खाणे बंद करावे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय रद्द करावा.यासाठी ५ ऑक्टोबर रविवार रोजी या मंत्री समितीच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे होळी करण्यात आल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी यावेळी व्यक्त केली.

  ते पुढे म्हणाले की,पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पहिले प्रतिटन ५ रुपयावरून आता १५ रुपये दर निश्चित केला असून यातील ५ रुपये हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिले जाणार तर उर्वरित १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा होणार आहे. हे १० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वर दरोडा घालण्याचा प्रकार असून संपूर्ण १५ रुपये पूरग्रस्तांना देण्याचा शासनाचा निर्णय असता तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार सहकार्य केले असते. मात्र ५ रुपये पुरग्रस्तांना आणि १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत ठेवण्यात येणार असल्याने या निर्णयाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर विरोध करण्यात येत आहे. 

   यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ, विजय लहाने, गणेश कव्हळे, विठ्ठल बांड, राजू राठोड, अमरसिंग राजपूत,नामदेव भोले आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments