Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गोंदी सर्कल मध्ये पकंज सोळुंके पाटील यांना उमेदवारीसाठी जनतेचा पाठिंबा

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 


अंबड - घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील गोंदी सर्कल मध्ये सध्या शिवसेना शिंदे गटातून जनतेमध्ये एकाच नावाची चर्चा आहे. ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे अंबड तालुका अध्यक्ष पंकज सोळुंके पाटील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे अंबड तालुका अध्यक्ष पंकज पाटील सोळुंके हे गोंदी सर्कल मध्ये प्रबळ उमेदवार असल्याची चर्चा जनतेत आहे. गेलं 25 ते 30 वर्षापासून पक्ष निष्ठेने काम करणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे आणि जनतेशी घट्ट नातं जोडून ठेवणारे गोंदी ता अंबड येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा तालुका अध्यक्ष पंकज सोळुंके पाटील यांची ओळख आहे. लोकाभिमुख आणि जनतेचा विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख आहे. पंकज पाटील सोळुंके यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर निर्णय काढण्यासाठी सदैव पुढाकार घेतला आहे. आमदार हिकमत दादा उडान यांच्या नेतृत्वाखाली अंबड - घनसावंगी मतदार संघात विकासाची गती वाढवली असून त्याचा परिणाम म्हणून गोंदी सर्कल मधील ग्रामपंचायती, सहकारी संस्था, शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व जाणवत आहे. गोंदी सर्कल मध्ये अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकताना दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गोंदी सर्कल मध्ये स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर असा आहे की, पंकज पाटील सोळुंके यांना जिल्हा परिषद गोंदी सर्कल मधून तिकीट दिल्यास शिवसेना शिंदे गटाला मोठे बळ मिळेल . त्यांच्या कार्यतत्परतेचा, अनुभवाचा आणि जनसंपर्काच्या बळावर पक्षाला निश्चित विजय मिळेल. घुंगर्डे हादगाव अणि परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व युवकांमध्ये सध्या पंकज सोळुंके पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रचंड अपेक्षा असून, त्यांच्या नावावरून पक्षाच्या गोटातही चांगलीच चर्चा रंगली आहे. राजकीय जाणकारांचे एकच म्हणणे आहे की, गोंदी सर्कल मधील मतदारांचा कल शिवसेना शिंदे गटाकडे असून पंकज पाटील सोळुंके यांना तिकीट मिळाल्यास या गोंदी सर्कलमध्ये शिवसेना शिंदे गटाचा निश्चित विजय होईल अशी एकच चर्चा सध्या गोंदी सर्कलमध्ये आहे .

Post a Comment

0 Comments