Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मनपा शाळेतील मुलांना स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज

 मनपा शाळेतील मुलांना स्पर्धेच्या व जागतिकीकरणाच्या युगात  गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज 


– जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल. 


       जालना, (जिमाका):- 

 आजच्या स्पर्धात्मक व जागतिकीकरणाच्या युगात मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकण्यासाठी  सक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी केले.

          जालना शहरातील महापालिका  शाळेत कार्यरत सर्व शिक्षकांचे कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन आज दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी जालना शहर महानगरपालिका सभागृहात करण्यात आले होते या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, शिक्षणाधिकारी फैसल शहा अहेमद, प्रशिक्षक म्हणून दीपक दराडे व  राधा घुगे  यांची उपस्थिती होती. 

         जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल म्हणाल्या की, जालना शहरातील महानगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करणे गरजेचे आहे, कारण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मुलांना टिकून राहायचे असेल तर इंग्रजी भाषा अवगत करणे खुप महत्त्वाचे झाले आहे. तसेच मनपा शाळेमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सोबतच मनपा शाळेमधील मुलांना डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्याचा लवकरच प्रयत्न केला जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षकांचे कौशल्यवर्धन, मूलभूत पायाभूत सुविधा व विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण या घटकांवर देखील काम करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला समान शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

          यावेळी प्रशिक्षणास मार्गदर्शन करतांना दिपक दराडे म्हणाले की, शिकायचं कसं हे शिकवलं की, मूलं स्वतःच्या गतीने व पद्धतीने व जोमाने शिकतात यासाठी शिक्षकांने प्रत्येक मुलांच्या क्षमतांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मुलांच्या क्षमता व अध्ययनगती एकदा लक्षात आली की, कुठल्या मुलांला काय शिकवायचे हे शिक्षकांना समजते.

_*_*_*_*_

Post a Comment

0 Comments