देहात गहू बियाणे चर्चासत्र घुंगर्डे हादगाव येथे उत्साहात संपन्न
बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
घुंगर्डे हादगाव, ता. अंबड, जि. जालना | 18 नोव्हेंबर 2025
भारतातील अग्रगण्य कृषी-तंत्रज्ञान कंपनी देहात आणि घुंगरडे हादगाव येथील सुप्रसिद्ध सोहन कृषी उद्योग सेवा चे संचालक गणेश फिस्के यांच्या संयुक्त विद्यमाने, उच्च दर्जाची चव व उत्पादन क्षमता असणाऱ्या DeHaat संशोधित गहू वाण DWS 555 व DWS 777 याविषयी मार्गदर्शनपर चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक देहातचे महाराष्ट्र राज्य डेप्युटी जनरल मॅनेजर विशाल राजेभोसले यांनी DWS 555 आणि DWS 777 या वाणांच्या अप्रतिम चव आणि उच्च उत्पादनक्षमतेवर भर देत शेतकऱ्यांनी या वाणांची निवड करावी, असे आवाहन केले.
मार्गदर्शन सत्रात शेतकऱ्यांना DWS 777 वाणाची वैशिष्ट्ये सांगताना - लांब व चमकदार दाणा, गडद गव्हाळ रंग, उत्कृष्ट चव, न पडणारा व न लोळणारा, तसेच 1000 दाण्यांचे वजन 48 ग्रॅम असल्याची माहिती देण्यात आली.
तसेच DWS 555 वाणाविषयी - बुटका व ठोस दाणा, MP सिहोर (शरबती) दर्जाची अप्रतिम चव, उत्तम उत्पादनक्षमता व 1000 दाण्यांचे वजन 46 ग्रॅम अशी वैशिष्ट्ये शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली.
देहातचे जालना मॅनेजर रोहित पाटील यांनी देहात संस्थेची शेतकरी-केंद्रित भूमिका विशद करताना म्हटले की, “बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी देहात सतत कार्यरत असून, शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठीही संस्था कटिबद्ध आहे.”
असिस्टंट मॅनेजर महेश कोल्हे यांनी देहातच्या नव्या पिढींच्या क्रांतिकारी मका वाणांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली.
या चर्चासत्राला अंबड तालुक्यातील 200 हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमात देहात तर्फे गव्हाच्या भरघोस उत्पादन घेतलेल्या दहा शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. या हंगामासाठी 2001 लकी ड्रॉ बक्षिसांचा खजिना उपलब्ध केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास सोसायटी चेअरमन प्रल्हादसिंग परिहार, प्रगतशील शेतकरी उद्धवसिंग पवार, लक्ष्मण काकडे, रामेश्वर शेंडगे, सावता काळे हे आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments