घनसावंगी तहसील कार्यालयातील नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करा - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
जालना,दि.१८(जिमाका):-
घनसावंगी तहसील कार्यालयातील नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करावा तसेच प्रलंबित फेरफार, अवैध गौण खनिज उत्खनन यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
आज दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तहसील कार्यालय घनसावंगी येथे भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार पुजा वंजारी, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, संतोष इथापे, सोमनाथ तोतला, यादव यांच्यासह सर्व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे, वसूली वाढविणेबाबत निर्देश दिले. तसेच तहसील कार्यालयातील अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्याचे निर्लेखन करणे, कार्यालयीन स्वच्छता, पदवीधर मतदार संघाची नावनोंदणी याबाबत आढावा घेतला.तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहणी केली.
_*_*_*_*_

Post a Comment
0 Comments