अंबड नगर परिषदेचे नगराध्यक्ष :१४ सदस्य : १३२पैकी १२९ वैध तर ३ सदस्य अवैध
अंबड, पुढारी वृत्तसेवा : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रक्रियेत अपक्षासह विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज १० ते १७ नोव्हेंबर पर्यंत एका नगराध्यक्ष पदासाठी एकूण १४ उमेदवारी अर्ज तर ११ प्रभागातील २२ सदस्यांसाठी १३२ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल केली होते.
दरम्यान आज मंगळवार दि.१८ नोव्हेंबर रोजी आलेल्या सर्व अर्जाची उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी समोर छाननी करण्यात आली त्यात नगराध्यक्ष पदाचे १४ अर्ज तर सदस्य पदासाठी आलेले एकूण १२९उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले असून प्रभाग क्र.८ चे उमेदवार देशपांडे जयश्री सतीश, प्रभाग क्र.९ नारायणकर अमोल मुरलीधर व प्रभाग क्र.१० ठोंबरे कविता रवींद्र असे एकूण ३ उमेदवारांचे अर्ज काही त्रुटी अभावी अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी विजय चव्हाण यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments