नगर परिषद निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकारी यांची अंबड येथे भेट
जालना, दि.१८(जिमाका):-
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी नगर परिषद निवडणुकच्या अनुषंगाने भेट दिली व निवडणूक प्रक्रियेविषयी आढावा घेतला. नगर परिषद कार्यालय अंबड येथे नगर परिषद निवडणुकीसाठी प्राप्त अर्जांची आज रोजी छाननी सुरू होती. जिल्हाधिकारी यांनी या सर्व प्रक्रियेची पाहणी केली.
यावेळी उप विभागीय अधिकारी अंबड उमाकांत पारधी, तहसीलदार अंबड विजय चव्हाण यांच्या सह अन्य निवडणूक विषयक अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी उभारण्यात आलेले विविध कक्षांची त्यांनी पाहणी केली व नोडल अधिकारी यांना निवडणूक विषयक कामकाज चोखपणे पार पाडण्याबाबत निर्देश दिले.
जिल्हाधिकारी मित्तल यांनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर विशेष भर दिला. उमेदवार तसेच पक्ष कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे आणि प्रशासनाने कोणत्याही तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.या भेटीदरम्यान मतमोजणी कक्षाची व सुरक्षा कक्षाची पाहणी केली व मतदान केंद्रांची मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी नियोजन, साहित्य उपलब्धता, संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची स्थिती आदींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच निवडणूक कालावधीत आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी हे निर्देश त्यांनी दिले.
Post a Comment
0 Comments