पाथरवाला शिवारात गळफास घेऊन शेतकयाची आत्महत्या
बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
कर्जमाफी होत नसल्याने अतिवृष्टी व महापुराचे अनुदान मिळत नसल्याने पाथरवाला बुद्रुक येथील शेतकरी हरिभाऊ आसाराम अवधूत याने दोन दिवसापूर्वी पाथरवाला शिवारात कपाशीच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि 4 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. सविस्तर माहिती अशी की, बाजूच्या शेतात कापूस वेचणाऱ्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती गोंदी पोलिसांना दिली. गोंदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृत शेतकरी हरिभाऊ अवधूत यांच्या पश्चात मुलगा, मुलगी पत्नी असा परिवार आहे

Post a Comment
0 Comments