Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

श्री संत रामराव महाराज जन्मोत्सवानिमित्त सेवाभावाचा आदर्श; वारकरी भक्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

 श्री संत रामराव महाराज जन्मोत्सवानिमित्त सेवाभावाचा आदर्श; वारकरी भक्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन



मंठा/ प्रतिनिधी 

गुरुपौर्णिमा तसेच श्री संत रामराव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त वाटुर येथून श्रीक्षेत्र पोहरादेवीकडे पायी निघालेल्या वारकरी भक्तांच्या सेवेसाठी लिंबोना पाटी येथील हॉटेल लोकसेवा येथे फराळ, नाश्ता व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

     धार्मिक श्रद्धा, समाजसेवा आणि आरोग्य जनजागृती त्याचबरोबर आरोग्य शिबिरात वारकऱ्यांची रक्तदाब, मधुमेह तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यक त्या वारकऱ्यांना मोफत औषधांचे वितरण करून आरोग्यविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.

       यावेळी दिंडी प्रमुख गुलाब लोभानाईक आढे, उपाध्यक्ष भिमराव जयराम राठोड, अंकुश आढे, ज्ञानेश्वर राठोड, श्याम आढे, शेषराव आढे, सुभाष पवार, रवि आढे, प्रकाश आढे, नंदलाल आढे यांच्यासह अनेक वारकरी भक्त उपस्थित होते.

पालखी सोहळ्याचे पूजन आत्माराम राठोड, पत्रकार जगदीश राठोड, बाबा राठोड, संजय चव्हाण, बबनराव सोमान, पोलीस कर्मचारी रमेश चव्हाण, श्रीकांत काळे, अनिल राठोड यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

     आरोग्य शिबिरात डॉ. संदीप घुगे, डॉ. रुपाली, डॉ. जीवन मुरक्या, आरोग्य सहायक रंजीत देशमुख व सरकटे, औषध निर्माण अधिकारी गौरव मुंढे, आरोग्य सेवक द्रोपद मस्के, नारायण वानोळे, शरद खाडे, आरोग्य सेविका शिल्पा चव्हाण, तसेच आशा सेविका घनसावंत आणि प्रियंका आसोले यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले.

Post a Comment

0 Comments