आज दिनांक 23 जुलै रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा येथे प्राध्यापक संघटना बामूक्तो च्या वतीने काळ्याफिती लावून विद्यार्थ्यावर झालेल्या लाठी चार्ज चा निषेध करण्यात आला. नीट पेपर फुटी मुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत आहे 21 विद्यार्थ्यांचे जीव गेले आहेत. आणि सरकार फक्त बघायची भूमिका घेत आहे. कारवाईची मलमपट्टी करून नौटंकी करून सरकार हे दाबू पाहत आहे. जंतरम मंतरम ग्राउंड वर विद्यार्थ्यांचे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन सुरू आहे. मात्र आंदोलन इतके दिवस चालू असूनही सरकारने प्रधान चा राजीनामा घेतला नाही. मात्र उलट आंदोलन बदनाम करण्याचे कारस्थाना भाजपा च्या आय टी सेल कडून चालू आहे. पुलिसांनी मुलीवर लाठी चालवली. दिल्ली येथील गुंड पोलिसांसोबत लाठी चार्ज करत आहे. अमानुषपणे मुलींना मारहाण झाली आहे. या सर्व बाबीचा निषेध व राजीनामाच्या आग्रही मागणीसाठी स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा येथे कळ्या फिती लावून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला

Post a Comment
0 Comments